दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त   

पहलगाम दहशतादी हल्ला

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटाने उद्ध्वस्त झाली. दोघेही लष्कर ए तोयबाचे दहशतवादी असून ते जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत.दोन्ही दहशतवाद्यांची घरे गुरुवारी रात्री स्फोटात नष्ट झाल्याचे सांगण्यात आले.आदिल हुसेन ठोकर आणि असीफ शेख, अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. पहलगाम येथील पर्यटनस्थळावर नुकताच हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात त्यांचा सहभाग आहे. लष्कराने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहीम हाती घेतली आहे. शोध मोहिमेदरम्यान त्यांच्या घरात ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. त्यात ती उद्ध्वस्त झाली, असे लष्कराकडून सांगण्यात आले. 
 
दरम्यान, ठोकर हा दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील असून दहशतावादी हल्ल्यातील प्रमुख संशयित आहे. शेख हा पुलवामा जिल्ह्यातील त्रालचा रहिवासी आहे. दहशतवादी हल्ल्यातील कारस्थानात त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. 
 

Related Articles